Sunday, April 1, 2007

Team India

"ग्रहण' आणि "गुढी'
खऱ्याखुऱ्या खग्रास सूर्यग्रहणाच्या
दोन दिवस आधीच...
"
टीम इंडिया'च्या "सूर्या'ला
ग्रहण लागलं...
बांगलादेशच्या चंद्रानं झाकोळून टाकलं...
आणि देशभर अंधार पसरला...
"
पोर्ट ऑफ स्पेन'च्या मैदानाचं
चक्क "कुरुक्षेत्र' झालं...
"
स्वकीयां'शी लढायचं कसं, म्हणून
आधुनिक पांडवांचं अवसान गळालं...
युद्ध सुरू व्हायच्या आधीच "महाभारत' घडलं...
आणि "कृष्ण'ही थिजला...
अतिरथी, महारथी सारेच कुचकामी ठरले....
"
कागदावरचे वाघ' बिरुदाला सारेच जागले...
अपेक्षाभंगाच्या दुःखानं देशवासी पोळून निघाले...
आणि "शेजार' उजळून निघाला...
"
टीम इंडिया'! सॉरी! नाही, आमचंच चुकलं...
चुकीच्या पाखरावरती मन आमचं जडलं...
तोंडचा घास काढून कुणी नेताना
आमच्या डोळ्यांनी पाहिलं...
आणि मनाचा डोळा उगा भरून आला...
"
सूर्यग्रहण' हे, कधी तरी सुटेल...
अमावस्येची काजळी कधी तरी मिटेल...
विजयाची गुढी कधी तरी उंचावेल...
आणि... आजच गुढीपाडवा आला..!

No comments: