Tuesday, June 19, 2007

बघ

ज़न्माला आला आहेसथोडं जगून बघ ,जीवनात दु:ख खूप आहे ,थोडं सोसून बघ !चिमुट्भर दु:खाने कोसळू नकोस ,दु:खाचे पहाड चडून बघ !यशाची चव चाखून बघ ,अपयश येत, निरखून बघ ,डाव मांडणं सोपं असतं ,थोडं खेळून बघ !घरटं बांधणं सोपं असतं ,थोडी मेहनत करुन बघ !जगणं कठीण असतं , मरणं सोपं असतं ,दोन्हीतल्या वेदना झेलून बघ !ज़ीणं - मरणं एक कोडं असतं ,जाता - जाता एवढं सोडवून बघ

No comments: